Pages

Thursday, July 29, 2010

उसाटगिरी

नाणेघाट :माळशेज घाट
नेहमी प्रमाणेच आम्ही रात्री १२ नंतर वसई हून निघालो नाणेघाट साठी. आम्ही तब्बत ४९ जण होतो या ट्रेकला तसे पहिले तर "वसई एडवेंचर क्लब" चा ट्रेक म्हटले की "शीत तिथे जमतील भूत" प्रमाणे पूर्ण ट्रेक परीवार एकत्र येतो या परीवारात आजी-आजोबा, काका-काकी,मामा-मामी,मावशी,आत्या,खूप साऱ्या बहीणी- भावंडे आणि लहानसा गोंडस असे बालक पण असते. आहो विचार काय करता आपला क्रिश हो चिमुरडा अवघ्या साडे चार वर्षाचा आहे पण एका दमात त्याने नाणेघाट सर केला तसा तो गेली ३ वर्षा पासून ट्रेक करतो .
रात्रभर बस मध्ये डुलक्या टाकत पेंगत पेंगत आम्ही भल्या पहाटे ३.३० वाजता नाणेघाटच्या पायथ्याशी पोचलो. बस मधेच थोडावेळ गाणी बोलत ,गप्पा मारत आणि काही जण झोपत असा वेळ घालवला. ५ वाजेपर्यंत हळू हळू पूर्ण बस मध्ये जग आली आणि मग जो तो ब्रश घेऊन बस मधून पाय उतार झालो . आणि दर्शन दादाने लगेच चहाला आदाण ठेवले आणि त्यात अजून चव वाढवण्या साठी सुहास बंदू योगेश (बाब्या) असे सगळे मिळून चाहत ढवळा-ढवळ करून लागले, त्या ढवळा-ढवळी मुळे चहाची चव मस्तच होती .न्याहारी साठी जोडीला प्याटीस घेऊनच गेलो होतो मस्त चहा न्याहारी उरकून आम्ही पायथ्याशी मोठासा गोल करून उभे राहिलो नेहमी प्रमाणेच सगळ्यांची ओळख परेड झाली आणि दर्शन दादाने काही महत्वाच्या सूचना करून आम्ही सगळे रवाना झालो.
काही पावले चालून गेल्यावरच पाण्याचा खूप खळ खळाट सुरु झाला आमच्या उजव्या बाजूला खूप मोठे पाण्याचा ओहोळ वाहत होता . तिथेच ओहोळामध्ये पाय सोडून बसावेसे वाटत होते ,पण जास्त वेळ थांबता आले नाही तसेच आम्ही पुढे निघालो थोडे अंतर चढून जातो ना जातो तोवर समोर मस्त ओहोळ वाहत होता त्यातूनच आम्ही वाट काढून गेलो .(आमची इच्छाही पूर्ण झाली )

पुढील वाट घनदाट झाडीतून जाणारी होती ,बऱ्याच ठिकाणी झाडी काटेरी होती कट्या कुट्या तून वाट काढत काढत आम्ही पुढे जात होतो . ४० मिनीटे चालून गेल्यावर थोडे सपाट मैदान लागले तिथे १० मिनिटांचा थांबा होता .
पुन्हा आम्ही वरची वाट धरली पुढील बराचसा रस्ता खडकाळ होता,घाटातून धाव घेत घाली येणाऱ्या पाण्यातूनच आम्ही वर चाललो होतो .पऊस असल्याने आणि पाण्याच्या प्रवाह मुळे आमचा वेग थोडा कमी झाला होता .आम्हाला चढून जायला २.१५ मिनीटे लागली .
नाणेघाट चढून गेल्यावर प्रथम दर्शनी दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्वपूर्ण वैशिष्ट आहे . या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू शकतात. सध्या वापरण्यात येणा-या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्य भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत. हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत.
गुहेच्या डाव्या बाजूलाच थोडी वर चढत जाणारी वाट म्हणजेच "नाणेघाट ".
नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला होता . प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर कोरून (फोडून) ह्या मार्गाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल हे महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्यांचे राज्य सुमारे इ.स पूर्व अडीचशे वर्ष तर ते इ.स नंतर अडीचशे वर्षेअसे जवळजवळ पाचशे वर्ष होते. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जात असे . या व्यापार्‍यांकडून जकात(कर) जमा केली जात असे . त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे आपल्याला पहावयास मिळतो. नाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यांनी बनलेली आहे. साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रूंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे. अदमासे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात होता . जकातकर रुपाने यात तत्कालीन 'कर्षापण' नावाची नाणी टाकली जात असत.
पूर्ण नाणेघाट फिरून झाल्यावर आम्ही पोट पूजा उरकली .
आता पावसाने चांगलाच जोम धरला होता आणि ढगही खूप होते "मला बराच वेळ ढगात असल्या सारखे वाटले ". ;-)
जेवण उरकून आम्ही परतीच्या वाटेला लागलो , चांगलेच घुडगाभर पाणी होते वाटेत .धडपडत,सावरत,गोल करत करत आम्ही खाली उतरत होतो ,पावसाचे फटकारे तोंडावर बसत होते .(पावसाने चांगलेच झोडपले आम्हाला ) पावसाच्या वेगाने आमचा वेग खूप मंदावला होता आम्हाला जेवढा वेळ चढायला लागल्या त्या पेक्ष्या थोडा जास्त वेळ आम्हाला उतरण्य साठी लागला .
परतीची वाट पाकड्या आधी आम्ही माळशेज घाटात जाऊन धबधाब्या दुम्बायचे होते . मनसोक्त पाण्यात दुम्बा दुम्बी केल्यावर आम्ही परतीची वाट धरली .


उसाट
अनुजा सावे

No comments:

Post a Comment