Pages

Friday, April 23, 2010

कसाबचे कसब

कसाबचे कसब -
दया करावी सरकारने कसाबवर आता
नको पहारे, संरक्षण, कोर्ट , कचेरी येता जाता
करोडोचा खर्च वाचेल भारत भूमीचा
सारे श्वास घेतील सुख-समाधानाचा
दिवस ठरवून ताजमहाल जवळ रविवार
साऱ्या भारतीयांस वेळ कळवावी अगोदर
गावी आपल्या जाण्यासाठी सोडावे कसाबला
निर्दोष घोषित करावे अगोदर त्याला
न द्यावे संरक्षण,अथवा कवच कसले
स्वतंत्र भारतीय पुरवतील त्याचे चोचले
प्रत्येकास राग प्रकटण्यास मिळेल संधी
पुन्हा अतिरेक्यांना सुचणार नाही दुर्बुद्धी .रामकृष्ण सावे
माहीम (तांबळाई )